त्रिंबक प्रशालेच्या पटांगणावर रंगल्या शूटिंगबॉल स्पर्धा
आचरा प्रतिनिधी
क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग व माध्यमिक शिक्षण समिती संचलित जनता विद्या मंदिर त्रिंबक आयोजित कोल्हापूर विभागीय शालेय शुटिंग बॉल स्पर्धा जनता विद्या मंदिर त्रिंबक प्रशालेच्या भव्य मैदानावर पार पडल्या. या स्पर्धेत सदर स्पर्धेत सातारा जिल्हा, सांगली जिल्हा, कोल्हापूर जिल्हा, रत्नागिरी जिल्हा, सिंधुदुर्ग जिल्हा, इचलकरंजी महानगरपालिका, कोल्हापूर महानगरपालिका व सांगली महानगरपालिका अशा एकूण 17 संघानी भाग घेतला होता. या स्पर्धेचे उद्घाटन श्री. संजय कदम अध्यक्ष, जिल्हा डायरेक्ट शुटिंग बॉल असोसिएशन यांचे हस्ते करण्यात आले.
ही स्पर्धा 19 वर्षे मुले, मुली, 17 वर्ष मुले , मुली अशा चार गटात घेण्यात आल्या. या स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे स्पर्धेचा गटानुसार निकाल
19 वर्ष मुले प्रथम क्रमांक- सांगली जिल्हा,
द्वितीय क्रमांक- कोल्हापूर जिल्हा, तृतीय क्रमांक- सातारा जिल्हा..
19 वर्षे मुली प्रथम क्रमांक –सांगली मनपा,
द्वितीय क्रमांक –सिंधुदुर्ग ,कुडाळ, तृतीय क्रमांक –कोल्हापूर जिल्हा,
17 वर्ष मुले प्रथम क्रमांक –सांगली जिल्हा,
द्वितीय क्रमांक -सिंधुदुर्ग जिल्हा,त्रिंबक तृतीय क्रमांक — कोल्हापूर जिल्हा,
17 वर्ष मुली प्रथम क्रमांक –सांगली मनपा,
द्वितीय क्रमांक -कोल्हापूर जिल्हा, तृतीय क्रमांक –सांगली जिल्हा.
विजयी संघाना आकर्षक चषकानी गौरविण्यात आले तसेच रितेश शिके यास मुलामधुन तर मुलींमधुन प्राजक्ता आवळे यांना सामनावीर म्हणून निवडण्यात आले व त्यांना आकर्षक चषक देऊन गौरवण्यात आले. तसेच सर्व पराभुत संघाना सुद्धा सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आले.
स्पर्धा नियंत्रक म्हणून श्री. अजय शिंदे सर मालवण यांनी काम पाहिले सदर स्पर्धेला पंच म्हणून दाभोलकर सर, शशी गवंडे, बबन गवस, एकनाथ केसरकर, सुरेंद्र सकपाळ, महेश परुळेकर,राजू भावे, सिताराम सकपाळ, जयवंत बागवे ,सर्व जिल्हापंच इत्यादी तज्ञ पंचानी काम पाहिले. स्पर्धा नियोजनाकरिता अध्यक्ष- माध्यमिक शिक्षण समिती, त्रिंबक सुरेंद्र सकपाळ, क्रीडा शिक्षक जनता विद्या मंदिर त्रिंबक महेंद्र वारंग यांनी विशेष परिक्ष्रम घेतले, त्यांना अरुण घाडी, प्रवीण घाडीगावकर, अभिजीत धुरे,प्रशांत गोसावी,एकनाथ गायकवाड, विजय मेस्त्री,घाडीगावकर मॅडम व तावडे मॅडम यांनी व प्रशालेच्या मुलांनी बहुमोल सहकार्य केले. सर्व कार्यक्रमांचे सूत्रसंचलन महेंद्र वारंग सर यांनी केले तर आभार प्रशांत गोसावी सर यांनी मानले.
सदर स्पर्धेला जिल्हा क्रीडा अधिकारी मा. विद्या शिरस मॅडम यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या. सदर स्पर्धेला राष्ट्रीय खेळाडू श्री. योगेश गावडे, श्री. राजा देसाई, श्री. संजय कदम, श्री . प्रमोद मोहिते, श्री . दिनेश पवार, श्री .बाबा सावंत अशा जिल्ह्यातील अनेक नामवंत खेळाडूंनी तसेच गावातील सरपंच, उपसरपंच, संस्था पदाधिकारी तसेच जिल्ह्यातील अनेक शिक्षक यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या









