प्रतिनिधी /पणजी
गोवा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (गोवा बोर्ड) घेतलेल्या दहावी परीक्षेचा निकाल येत्या बुधवारी 1 जून रोजी सायंकाळी 5.30 वा. जाहीर करण्यात येणार आहे.
दोन सत्रात घेण्यात आलेल्या या परीक्षेला एकूण 20572 मुले बसली होती. त्यात 10530 मुलगे तर 10042 मुलींचा समावेश आहे. एकूण 31 केंद्रातून आणि 173 उपकेंद्रातून ती परीक्षा घेण्यात आली. गोवा बोर्डाच्या www. gbshse. nfo या वेबसाईटवर निकाल उपलब्ध होणार आहे.









