31 डिसेंबरपर्यंत 40 टक्के शुल्क : संभाव्य दरवाढीच्या पार्श्वभूमीवर केंद्राचा निर्णय
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
कांद्याची भाववाढ रोखण्यासाठी आणि देशांतर्गत बाजारपेठेतील पुरवठा सुधारण्यासाठी सरकारने शनिवारी कांद्याच्या निर्यातीवर 40 टक्के शुल्क लागू केले. परिणामत: परदेशात कांदा विकल्यास विव्रेत्याला 40 टक्के शुल्क सरकारला भरावे लागणार आहे. या निर्णयाची अंमलबजावणी तत्काळ प्रभावाने सुरू झाली आहे. 31 डिसेंबर 2023 पर्यंत कांद्यावर 40 टक्के निर्यात शुल्क लावण्यासंबंधीची अधिसूचना शनिवारी अर्थ मंत्रालयाकडून जारी करण्यात आली आहे.
देशात सध्या ‘शंभरी’पार पोहोचलेले टोमॅटोचे भाव आता उतरू लागले आहेत. काही भागात अजूनही टोमॅटोची विक्री 100 ऊपयांपेक्षा जास्त किलोने होत आहे. याचदरम्यान, कांद्याचे भाव वाढण्याची शक्मयता विचारात घेऊन केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. कांद्याचे भाव टोमॅटोप्रमाणे गगनाला भिडू नयेत यासाठी सरकार आधीच वेगवेगळी पावले उचलत आहे. सरकारने कांद्यावर 40 टक्के निर्यात शुल्क तात्काळ लागू केले असून ते 31 डिसेंबर 2023 पर्यंत लागू राहील. याबाबत सरकारने अधिसूचना जारी केली आहे.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) बुलेटिनमध्ये म्हटले आहे की ऑगस्टमध्ये टोमॅटोच्या किमती आणखी वाढू शकतात. मात्र, अलीकडच्या आकडेवारीत टोमॅटोच्या दरात काहीशी घसरण झाली आहे. सप्टेंबर महिन्यात कांद्याच्या दरातही वाढ होण्याची शक्मयता अनेक अहवालांमध्ये व्यक्त करण्यात आली आहे. कांद्याचा भाव 50 ते 60 ऊपयांपर्यंत पोहोचण्याची शक्मयता आहे. निकृष्ट दर्जाच्या कांद्याचा मोठा साठा आणि इतर भाज्यांची वाढलेली महागाई देखील कांद्याच्या दरात वाढ होण्यास कारणीभूत असल्याचे अनेक व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.
कांदा उपलब्धतेसाठी वेगवेगळे प्रयत्न सुरू
सरकार कांद्याच्या वितरणासाठी अनेक मार्ग शोधत आहे. गेल्या आठवड्यापासून कांदा दरात वाढ होण्यास सुरुवात झाली असून नजिकच्या काळात दर आणखी भडकू शकतात. याच पार्श्वभूमीवर ऑक्टोबरमध्ये नवीन पीक येईपर्यंत किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी सरकारने आपल्या बफर स्टॉकमधून विशिष्ट भागात कांदा उपलब्ध करण्याची घोषणा गेल्या आठवड्यातच केली होती. सरकार कांद्याच्या वितरणासाठी ई-लिलाव, ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मसह विविध माध्यमांचा शोध घेत आहे. तसेच ग्राहक सहकारी संस्था आणि कॉर्पोरेशन्सद्वारे चालवल्या जाणाऱ्या रिटेल आउटलेटद्वारे सवलत देण्यासाठी राज्य प्राधिकरणांशी भागिदारी केली जात आहे.
भाजीपाला आणि तृणधान्यांच्या किमतीत मोठी वाढ झाल्यामुळे किरकोळ महागाई दरात वाढ झाली आहे. गेल्या महिन्यात किरकोळ महागाई 7.44 टक्क्मयांवर गेली आहे. महागाईने 15 महिन्यांचा उच्चांक गाठला आहे. जुलैमध्ये टोमॅटो दरात झालेल्या वाढीचा परिणामही महागाई दरावर झालेला दिसून येत आहे.