नेगीलयोगी राज्य शेतकरी संघटनेची मागणी
खानापूर : तालुक्यातील वीजपुरवठा गेल्या काही महिन्यापासून सुरळीत नसल्याने शेतकरी तसेच सामान्य जनतेला नाहक त्रास सहन करावा लागत आहे. खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे शेतकऱ्यांचे दिवस वाया जात आहेत. यासाठी हेस्कॉमच्या अधिकाऱ्यांनी तालुक्यातील शेतातील तसेच घरगुती वापरासाठी वीजपुरवठा सुरळीत करण्यात यावा, अशा मागणीचे निवेदन नेगीलयोगी राज्य शेतकरी संघटनेच्यावतीने अध्यक्ष रवि पाटील यांच्या नेतृत्वाखाली हेस्कॉम कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन देण्यात आले. हेस्कॉमचे अधिकारी मोहिते यांनी निवेदनाचा स्वीकार करून वीजपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिले. निवेदनावर शंकर बोळण्णावर, वासू सत्यन्नावर, सुरेश वाली, भाग्यश्री हणबर, कल्लाप्पा रपाटी यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.









