3 मार्च रोजी युपीआय व्यवहार पंधरवड्याचे आयोजन
बेळगाव : प्रवास अधिक सुखकर करण्यासाठी परिवहनने कॅशलेस प्रणालीला चालना दिली आहे. त्यामुळे सुट्या पैशांची कटकट थांबली आहे. राज्यात प्रथमच तिकीटसाठी युपीआय प्रणाली स्वीकारण्यात आली आहे. त्यामुळे परिवहनचा प्रवास अधिक सुखकर होऊ लागला आहे. या योजनेला अपेक्षित प्रतिसाद मिळू लागला आहे. त्यामुळे युपीआयच्या माध्यमातूनही समाधानकारक महसूल प्राप्त होऊ लागला आहे. त्यामुळे युपीआय कॅशलेस प्रणालीचा प्रयोग सर्वत्र यशस्वी होत आहे. परिवहनमंत्री रामलिंगारेड्डी यांनी फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात कॅशलेस प्रणालीचा शुभारंभ केला होता. त्यानंतर राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर ही प्रणाली सुरू झाली होती. त्यानंतर राज्यभर या प्रणालीची अंमलबजावणी सुरू झाली आहे. या योजनेला सर्वत्र उत्तम प्रतिसाद मिळू लागला आहे. या प्रणालीतून कोट्यावधी रुपयांचा महसूल मिळू लागला आहे. कॅशलेस युपीआय प्रणालीला प्रोत्साहन देण्यासाठी 3 मार्च रोजी युपीआय व्यवहार पंधरवडा साजरा केला जाणार आहे, अशी माहितीही व्यवस्थापकीय संचालक भरत एस. यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.









