चिपळूण :
चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार शेखर निकम यांच्या प्रचाराचा शुभारंभ सोमवारी सायंकाळी वालोपे येथे करण्यात आला. यावेळी पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी गावात काढलेल्या प्रचारफेरीला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सध्या विधानसभा निवडणुकीची प्रचारधुमाळी सुरू असून घरोघरी प्रचारावर भर दिला जात आहे. वालोपे येथील झोलाई देवी मंदिरात सोमवारी महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी एकत्र येत नारळ फोडून प्रचाराचा शुभारंभ केला. सर्वांनी घरोघरी भेट देत उमेदवार शेखर निकम यांना विजयी करण्याचे आवाहन केले.








