उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली भावना
पिंपरी / प्रतिनिधी
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली भावना ‘श्री संत तुकाराम महाराज पुरस्कार माझ्या सारख्या सर्वमान्य कार्यकर्त्यांला देहू संस्थानने दिला. पुरस्कारासाठी योग्य समजले, हे माझ्यासाठी फार भाग्याचे आहे. मनात आनंद, समाधान आहे. वारकरी संप्रदायाबद्दल पूर्वीही आदर होता. आज अधिक वृद्धिंगत झाल्याची’, भावना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली.
जगद्गुरू श्री संत तुकाराममहाराजांच्या 375 व्या बीज सोहळ्यानिमित्त देहू संस्थानच्या वतीने उपमुख्यमंत्री शिंदे यांना ‘श्री संत तुकाराम महाराज पुरस्कार’ रविवारी प्रदान करण्यात आला. पुरस्कारानंतर शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला. देहू संस्थानचे अध्यक्ष हभप पुरुषोत्तम महाराज मोरे, देवस्थानचे विश्वस्त माणिक महाराज मोरे, संजय महाराज मोरे, खासदार श्रीरंग बारणे, आमदार विजय शिवतारे, शरद सोनवणे, शिवसेनेच्या उपनेत्या सुलभा उबाळे, सारिका शेळके आदी उपस्थित होते. शिंदे म्हणाले, ‘हा पुरस्कार एकट्याचा नाही. माझ्यावर, माझ्या कामावर प्रेम करणार्या, वारकरी, धारकरी, शेतकरी, लाडकी बहिणी, लाडक्या भावांचा सर्वांचा पुरस्कार आहे. पुरस्कार मिळाल्याने माझी जबाबदारी वाढली आहे.
समाजाची सेवा अधिक जोरकसपणे करण्याची प्रेरणा यातून मिळाली आहे. वारकर्यांची सेवा करण्याची संधी पुरस्काराने मिळाली आहे. त्यामुळे मीस्वत:ला भाग्यवान समजतो. छत्रपती शिवाजी महाराज आणि संत तुकाराम महाराजयांची भेट झालेली ही पवित्र भूमी आहे. या पवित्र भूमीत हा पुरस्कारमिळतोय यापेक्षा दुसरे भाग्य नाही. पुरस्कार दिल्याबद्दल देहू देवस्थानचे मनापासून आभार मानतो’ असेही शिंदे यांनी म्हटले आहे.








