Pravin Darekar News : मुंबई जिल्हा बँकेच्या अर्थसहाय्यातून किमान ५००० लाभार्थी घडविण्याचे व किमान ५०० कोटीचे कर्जवितरण करण्याचे आश्वासन भाजप नेते, आमदार प्रविण दरेकर यांनी दिले.अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या लाभार्थी मेळाव्यात ते बोलत होते. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांच्या संकल्पनेतून माथाडी भवन,नवी मुंबई येथे हा मेळावा पार पडला.
यावेळी बोलताना नरेंद्र पाटील म्हणाले की, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळातर्फे मार्गदर्शन केंद्र सुरू केले आहे. या केंद्राच्या माध्यमातून नवी मुंबई,पनवेल परिसरातील मराठा बांधवांनी लाभ घ्यावा असे आवाहनही नरेंद्र पाटील यांनी केले.
या मेळाव्यास महामंडळाचे उप महाव्यवस्थापक आकाश मोरे,माथाडी संघटनेचे संयुक्त सरचिटणीस पोपटराव देशमुख,अखिल भारतीय मराठा महासंघाचे ठाणे जिल्हाध्यक्ष संतोष बर्गे,अंकुश लांडे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.








