वृत्तसंस्था/तिरुअनंतपुरम
केरळ विधानसभेने केंद्र सरकारला ‘वन नेशन, वन इलेक्शन’ सुधारणा मागे घेण्याचे आवाहन करणारा ठराव मंजूर केला आहे. केंद्र सरकारकडून ‘एक देश, एक निवडणूक’ला मंजुरी देत एकत्रित निवडणुकांसाठी प्रयत्न चालवले असतानाच केरळ विधानसभेने त्याला विरोध करणारा ठराव संमत केला आहे. ‘वन नेशन, वन इलेक्शन’ हे अलोकतांत्रिक आणि देशाच्या फेडरल रचनेसाठी हानिकारक असल्याचे वर्णन राज्याचे संसदीय कामकाज मंत्री एम. बी. राजेश यांनी मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांच्या वतीने मांडले. आरएसएस आणि भाजपचा अजेंडा राबवण्याचा हा प्रयत्न असल्याचा दावा राजेश यांनी केला आहे.









