कोयना :
वसाहत कराड-ढेबेवाडी मार्गावरील घारेवाडी येथे रस्त्यावरच असलेले घर अपघातस्थळ म्हणून ओळखले जात होते. गेल्या दहा वर्षापासून या घराचे अतिक्रमण हटविण्याबाबत कार्यवाही न झाल्याने अनेकांना या ठिकाणी अपघाताला सामोरे जावे लागत होते. पण अखेर कराड दक्षिणचे आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी पुढाकार घेऊन, संबंधित मिळकतदाराशी चर्चा करून घराचे हे अतिक्रमण काढण्याबाबत सकारात्मक तोडगा काढला आहे. त्यामुळे दीर्घकाळ या प्रमुख जिल्हा मार्गावर अडथळा ठरलेले ‘ते’ घर काढण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला.
कराड-ढेबेवाडी या प्रमुख जिल्हा मार्ग क्र. ५५ च्या चौपदरीकरणास सन २०१२ मध्ये प्रारंभ करण्यात आला. अत्यंत महत्त्वाचा मार्ग असलेल्या या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक होते. रस्त्याचे चौपदरीकरण झाल्याने या मार्गावरील वाहतूक मोठ्या प्रमाणावर वाढली. पण या चौपदरीकरणावेळी घारेवाडी येथे या रस्त्यावरच असलेले पांडुरंग कांबळे व बाळकृष्ण कांबळे यांचे राहते घर मात्र न हटल्याने अपघातांची गंभीर समस्या निर्माण झाली. हे घर इथून हटवून या कुटुंबाचे पुनर्वसन अन्य ठिकाणी करण्याबाबत त्याकाळी अनेक प्रयत्न झाले. पण त्याबद्दल सकारात्मक तोडगा न निघाल्याने गेली जवळपास दहा वर्षे हे घर रस्त्यावरच अडथळा बनून राहिले होते. ज्यामुळे या ठिकाणी अनेक गंभीर अपघातही झाले.
ही समस्या लक्षात घेऊन आमादर डॉ. अतुलबाबा भोसले यांनी या घराचे अतिक्रमण हटविण्याबाबत पुढाकार घेतला. पांडुरंग कांबळे व बाळकृष्ण कांबळे यांच्याशी व त्यांच्या कुटुंबीयांशी चर्चा करून, रस्त्यावर अडथळा बनलेले हे घर सुरक्षेच्या कारणास्तव हटविण्याबाबत त्यांची समजूत काढली. तसेच यासाठी शासनाच्या माध्यमातून नुकसानभरपाई मिळवून देण्याचीही ग्वाही दिली. त्यामुळे कांबळे कुटुंबीयांनी आमदार डॉ. भोसले यांच्या मध्यस्थीला सकारात्मक प्रतिसाद देत, आपले घर हटविण्याबाबत सकारात्मकता दर्शविली. त्यामुळे या घराचे अतिक्रमण हटविण्यास आजपासून प्रारंभ करण्यात आला. जनतेच्या हितासाठी व सुरक्षिततेसाठी ठोस निर्णय घेण्याची जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडत राहू, अशी ग्वाही आमदार भोसले यांनी दिली.
य. मो. कृष्णा साखर कारखान्याचे संचालक श्रीरंग देसाई, बबनराव शिंदे, माजी जिल्हा परिषद सदस्य शंकरराव खबाले, घारेवाडीच्या सरपंच सुवर्णा जाधव, विंगचे उपसरपंच सचिन पाचपुते, हेमंत पाटील, धनाजी शिंदे, उमेश घारे, अमित घारे, सुरेश घारे, शंकर घारे, वसंतराव घारे, जयवंत








