महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्नी कर्नाटक विरोधातील ठराव आज महाराष्ट्र विधिमंडळ हिवाळी अधिवेशनात एकमताने मंजूर करण्यात आला आहे. कर्नाटक सीमाप्रश्नी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून ठरावाच वाचनं करण्यात आलं. ठराव एकमताने मंजूर केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांकडून आभार मानण्यात आले. बेळगाव निपाणीसह 865 गावं महाराष्ट्रात आणण्याचा यावेळी एकनाथ शिंदें यांनी निर्धार केला. ठराव संमत झाल्यावर विधानसभेत घोषणाबाजी करण्यात आली.नेमका काय ठराव आहे जाणून घेऊया.
ठरावातील महत्त्वाचे मुद्दे–
सीमेवरील 865 गावं महाराष्ट्रात सामील करण्य़ासाठी प्रयत्न करणार .
-आवश्यक तो सर्व कायदेशीर पाठपुरावा सर्वोच्च न्यायालयात करण्यात येईल.
-सीमावर्ती भागात काम करणाऱ्या मराठी मंडळांना अर्थसहाय्य.
-865 गावातील मराठी भाषिक जनतेसोबत महाराष्ट्र शासन खंबारपणे उभं आहे.
-सीमाप्रश्नी बलिदान देणाऱ्यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत देणार.
-दरमहा 20 हजार रूपये मदतीची मुख्यंमंत्र्यांची घोषणा.
-865 गावातील नागरिकांना महाराष्ट्राचे नागरिक समजण्यात येणार.
-सीमावर्ती भागातील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक जागा राखीव ठेवणार.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








