अक्कलकोट प्रतिनिधी
शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे, अक्कलकोट तालुकाप्रमुख संजय देशमुख व शहरप्रमुख योगेश पवार व पदाधिका-यांनी पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्याकडे पक्षपदाचा व पक्ष सदसत्वाचा राजीनामा दिला.
अक्कलकोट तालुक्यातील शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी व समर्थकांशी विचार विनिमय करून अक्कलकोट शहर प्रमुख व तालुक्यातील शिवसेनेचे महत्वाचे पदाधिकार्यांनी माझ्या वर विश्वास ठेवून राजीनामा दिलेले आहेत. आजपर्यंत पत्रकारांसह आदींनी आम्हाला जे जे सहकार्य केले आहे त्या सर्वांचेच आभार मानून पुढील काळात ही समाजसेवेची कार्य करत लोकांच्या सेवे मध्ये अखंडपणे राहु असे यावेळी बोलताना शिवसेना तालुका प्रमुख संजय देशमुख यांनी ग्वाही दिली.
पुढे बोलताना शिवसेना तालुका प्रमुख संजय देशमुख म्हणाले, अक्कलकोट तालुक्यात गेल्या अडीच वर्षापासुन आजतागायत कोणतेच काम न झाल्यामुळे शिवसेना पदाधिकारीमधे तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. त्यामुळे आम्ही पक्ष पदाची राजीनामा देत असल्याचे सांगितले.शिवसेना तालुकाप्रमुख व शहर प्रमुख पदाचा राजीनामा बाबत जिल्हा संपर्कप्रमुख अनिल कोकीळ व जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे यांच्या कडे देखील प्रत माहिती स्तव पाठवण्यात आले आहे,असे शिवसेनेचे शहरप्रमुख योगेश पवार यांनी सांगितले.