ओटवणे प्रतिनिधी
ग्रामपंचायत कार्यालयात घुसून झाली होती मारहाण
तीन दिवसांपूर्वी माडखोल ग्रामपंचायत कार्यालयातच मारहाण होऊन कोणतीही कारवाई न झाल्यामुळे माडखोल ग्रामपंचायतचे दिव्यांग सदस्य संजय देसाई यांनी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा माडखोल सरपंचा शृष्णवी राऊळ यांच्याकडे दिला आहे.याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात संजय देसाई म्हणतात, गावात सुरक्षिततेच्या अभावामुळे आणि ग्रामपंचायत सदस्यांमध्ये असलेल्या परस्पर मतभेदामुळे आपण दिव्यांग सदस्य असूनही मारहाण झाली. ग्रामपंचायत कार्यालयात विकासात्मक दृष्टिकोन ठेवून काम केले जाते. परंतु अशा लोकायुक्त प्रतिनिधीलाच ग्रामपंचायत कार्यालयात मारहाण होत असेल लोकांसाठी कशासाठी काम करायचे? असा सवाल संजय देसाई यांनी केला.
या घटनेवरून ग्रामपंचायत कार्यालयात कायदा आणि सुव्यवस्थेचा पूर्णपणे अभाव असल्याचे स्पष्ट होते. पर्यायाने ग्रामपंचायत कार्यालयातच असे निंदनीय प्रकार होत असतील तर जनतेचे प्रश्न सोडविणे कठीण होत असल्याने आपल्या सदस्याचा राजीनामा देत असल्याचे संजय देसाई यांनी सांगितले.तसेच ग्रामपंचायत कार्यालयातच सुरक्षिततेचा पूर्णपणे अभाव असल्यामुळे ग्रामपंचायत प्रशासनाने याची त्वरीत दखल घ्यावी असे या पत्रकात म्हटले आहे.









