ऑनलाईन टीम / तरुण भारत :
‘मसल मॅन’ अशी ओळख असलेले मनसेचे बडे नेते मनीष धुरी (Manish Dhuri) यांनी तडकाफडकी पक्षातील सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. वैयक्तिक कारणास्तव हा राजीमामा देत असून, कोणत्याही पक्षात प्रवेश करणार नसल्याचे धुरी यांनी म्हटले आहे.
धुरी हे भारतीय विद्यार्थी सेनेपासूनचे राज ठाकरेंचे कट्टर समर्थक आहेत. ते मनसेचे अंधेरी विभागाचे अध्यक्ष होते. अनेक आंदोलनात त्यांचा सक्रिय सहभाग होता. राज ठाकरे यांना पत्र लिहून आपल्याकडील सर्व पदांचा राजीनामा देत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. पक्षातील अंतर्गत गटबाजीमुळे त्यांनी राजीनामा दिल्याचे बोलले जात आहे. ऐन मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर धुरी यांनी राजीनामा दिल्याने मनसेला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.
अधिक वाचा : शिवसेनेप्रमाणे राष्ट्रवादी, काँग्रेसही संपणार








