प्रतिनिधी, लांजा
आता केवळ नुसती आश्वासने नकोत तर प्रत्यक्ष कृती हवी, अशी मागणी करत चिंचुर्टी हुंबरवणेवाडी येथील ग्रामस्थ मंगळवारपासून उपोषणाला बसले आहेत. सलग आज चौथ्या दिवशी देखील उपोषण सुरूच आहे.
रस्त्याच्यां मागणीसाठी ग्रामस्थांनी उपोषणाकडे सरकार गांभीर्याने पहाणार का? असा सवाल करत लांजा तालुक्याच्या पूर्व भागात वसलेल्या चिंचुर्टी हुंबरवणेवाडी येथील ग्रामस्थांना रस्ता नसल्याने येथील ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेत उपोषणाचा मार्ग अवलंबला आहे. यापूर्वी अधिकारी वर्गाकडून केवळ आश्वासनेच मिळाली. त्यामुळे यावेळी आपले उपोषण कोणत्याही परिस्थितीत मागे घेणार नाही असा निर्धार ग्रामस्थांनी केला आहे.
रस्त्यासाठी उपोषणास बसलेल्या ग्रामस्थांची लांजा तहसीलदार प्रमोद कदम यांनी भेट देवून हा प्रश्न आमच्या पातळीवर सुटणार नाही. तर हा प्रश्न मंत्रालयातून सुटणार आहे .त्यामुळे तुम्ही तुमचे उपोषण मागे घ्या असे विनंती वजा आवाहन उपोषणकर्ते ग्रामस्थांना केले होते. मात्र काहीही झाले तरी आमचा प्रश्न जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही ,असा निर्धार ग्रामस्थांनी बोलून दाखवला होता.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









