नवी दिल्ली
सर्वोच्च न्यायालयाने दिल्लीतील अबकारी घोटाळ्याप्रकरणी माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या जामीन अर्जावर निर्णय मंगळवारी राखून ठेवला आहे. सिसोदिया यांना सीबीआय आणि ईडीकडून अबकारी घोटाळ्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. सिसोदिया हे सुमारे 8 महिन्यांपासून तुरुंगात आहेत. तर अबकारी घोटाळ्याप्रकरणी आम आदमी पक्षाला आरोपी करण्याचा विचार सुरू असल्याची माहिती सीबीआय आणि ईडीने सर्वोच्च न्यायालयाला दिली









