जुन्या जहाजाच्या शोधावेळी हाती लागले यंत्र
जुन्या काळात जहाजांद्वारेच मोठ्या प्रमाणात वाहतूक केली जायची. अशास्थितीत अनेकदा जहाजं बुडाल्याने अनमोल गोष्टीही समुद्रात सामावल्या जायच्या. अलिकडेच संशोधकांनी ख्रिस्तपूर्व पहिल्या शतकात युनानच्या एका बेटानजीक बुडालेल्या एंटीकिथेरा जहाजाशी निगडित काही गोष्टी मिळविल्या आहेत. यात एक जगातील पहिले एनालॉग कॉम्प्युटर मानले जाणारे ‘एंटीकिथेरा तंत्र’ सामील असल्याचे सांगण्यात येत आहे.
एंटीकिथेरा तंत्र सुमारे 2 हजार वर्षे जुने असून ते एक जटिल उपकरण होते, ज्याचा वापर ग्रहण, चंद्रकळा आणि बहुधा ग्रहांच्या वेगाच्या भविष्यवाणीसाठी केला जात होता. याचा शोध 1900 मध्ये कॅप्टन दिमित्रियोस कोंडोस आणि त्यांच्या साइमी बेटाच्या पाणबुड्यांच्या टीमने लावला होता. हे तंत्र इतके महत्त्वपूर्ण आहे की, त्याने हॉलिवूड चित्रपट ‘इंडियाना जोन्स अँड द डायल ऑफ डेस्टिनी’च्या काही हिस्स्यांना प्रेरित केले होते.
नवा शोध
एंटीकिथेरा जहाज प्रत्यक्षात एक अनमोल खजिना होता, यात जगातील पहिले एनालॉग कॉम्प्युटर मानले जाणारे एंटीकिथेरा तंत्रही होते. परंतु आता कहाणी काही औरच असल्याचे वाटते. एंटिकिथेराशी निगडित मिळालेल्या नव्या अवशेषांनी पुरातत्वतज्ञांसमोर एक नवे रहस्य उभे केले आहे. या जहाजासोबत आणखी एका जहाजाचे अवशेष मिळाले आहेत. हे बहुधा त्याच काळात खोल समुद्रात बुडाले होते. यात मिळालेल्या नव्या अवशेषांमध्ये जगातील पहिला एनालॉग कॉम्प्युटर असल्याचे मानले जात आहे. नव्या शोधाने माहिती मोठ्या प्रमाणात बदलून ठेवल्याने वैज्ञानिक चकित झाले आहेत. नव्याने मिळालेले अवशेषच खरे एंंटिकिथेरा तंत्र आहे का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
दोघांमध्ये मोठा फरक
जहाजाच्या अवशेषांमधून मिळालेले नवे लाकडी यंत्र, 1970 च्या दशकात मिळालेल्या लाकडापेक्षा आकार आणि रचनेत वेगळा आहे. स्वीत्झर्लंडच्या युनिव्हर्सिटी ऑफ जिनिव्हाचे लॉरेंज बॉमर यांनी या जहाजाच्या शोधासाठी एका अभियानाचे नेतृत्व केले. नव्या लाकडाची रुंदी जुन्या लाकडापेक्षा अत्यंत वेगळी आहे. 1970 मध्ये कूस्टो येथून मिळालेल्या लाकडाची रुंदी सुमारे 10 सेंटीमीटर होती, तर नव्या लाकडाची रुंदी केवळ 5 सेंटीमीटर असल्याचे त्यांनी सांगितले आहे. नव्याने मिळालेले अवशेष दुसऱ्या जहाजाचे आहेत का दुसऱ्या काळातील जहाजाचे आहेत, हे सांगणे कठिण ठरणार आहे. एंटिकिथेरा जहाजासोबत आणखी एक जहाज होते, असे संकेत मिळत आहेत. दोन्ही एकत्र बुडाली का काही अंतराने, हे सांगणेही अवघड आहे. नव्या शोधाने एकाचवेळी अनेक चकित करणारी माहिती मिळाली असून त्याची पुष्टी होण्यास वेळ लागणार आहे.









