बेळगाव :
केएलई आयुर्वेदिक कॉलेजमध्ये नेत्रचिकित्सा विभागाचे डॉ. आकाश मनोहर माहोरे यांनी लिहिलेले द व्हिजन टॅकर जर्नल भारतासह न्यूयॉर्क आणि अमेरिका येथेही लोकप्रिय झाले आहे. डॉ. माहोरे यांनी वाढत्या स्क्रीन टाईममुळे होणाऱ्या डिजीटल आय स्ट्रेनविषयी संशोधन केले असून दैनंदिन व्यायाम, ध्यान, एकाग्रता आणि स्वआकलन तंत्र याची माहिती त्यांनी पुस्तकात दिली आहे. याशिवाय मोतिबिंदू, रेटिना, कॉर्निया व डिजीटल व्हिजन केअर सेवा ते देत आहेत. ते मूळचे बुलढाणा जिल्ह्यातील खामगावचे असून केएलई आयुर्वेदमध्ये कार्यरत आहेत.









