खेड :
पूरस्थितीत अडकलेल्या नागरिकांना सुखरुप बाहेर काढून मदतीचा हात देण्यासाठी येथील नगर परिषदेने बचाव पथकांची नियुक्ती केली आहे. या बचाव पथकात नगर परिषदेतील अधिकारी व कर्मचारी तसेच बोट चालकांसह जीवरक्षकांचा समावेश आहे. पूरस्थितीदरम्यान घरांसह दुकानांमध्ये कोणी अडकले असल्यास या बचाव पथकांकडून तातडीने मदतीचा हात दिला जाणार आहे.
मुख्याधिकारी महादेव रोडगे यांच्या मार्गदर्शनाखाली नगर परिषदेतील आपत्ती व्यवस्थापन पावसाळ्यात २४ तास कार्यरत राहणार आहे. बचाव पथकात बाजारपेठ, स्वेड नगर परिषर गांधीचौक, साठे मोहल्ल, पोत्रिक मोहल्ल्यालगतच्या भागांचा समावेश आहे. येथे नोडल अधिकारी म्हणून नागेश बोंडले, सहाय्यक नोडल अधिकारी म्हणून दीपक देवळेकर, बोट चालक साईराज खेडेकर, निखिल चौधरी तर जीवरक्षकांमध्ये संतोष शिंदे, साहिल बुटाला, आयुष मुद्राळे, सर्फराज पांगारकर, सुरज शिगवण यांचा समावेश आहे.
पोलीस स्थानक बचाव पथकात खांबतळे, ब्राह्मणआळी, कासारआळी, नगर परिषद परिसर, नाना-नानी पार्क परिसर व इतर भाग समाविष्ट असून नोडल अधिकारी म्हणून प्रणय सस्ते, सहाय्यक नोडल अधिकारी म्हणून श्याम देवळेकर, बोट चालक साईराज साळवी, विक्रांत पाटील, तर जीवरक्षक म्हणून योगेश शिगवण, सागर आंजर्लेकर, अब्दुलबासित सुर्वे, आसिफ जुईकर, विपुल बर्वे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. क्षेत्रपाल मंदिर बचाव स्थानकात भुवडवाडी, पदुमलेवाडी, कुंभारवाडा, योगिता दंत महाविद्यालय परिसर व लगतचा इतर भाग समाविष्ट आहे.
नोडल अधिकारी म्हणून अक्षय लोहार तर सहाय्यक नोडल अधिकारी म्हणून राजेश खेडेकर, बोट चालक सुशांत महाडिक, प्रणय रसाळ तर जीवरक्षक म्हणून शुक्लेश काते, अरविंद सावंत, स्वप्निल जाधव, जयेश पवार, राजेश खेडेकर यांचा समावेश आहे. राखीव अग्निशमक इमारत रेस्क्यू स्थानकात बोट चालक व जीवरक्षक म्हणून प्रणव घाग, अफजल पांगारकर, महम्मद पांगारकर, मतीन कावलेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
अल सफा वेल्फेअर फाऊंडेशनची खासगी बोट साठे पोत्रिक मोहल्ला येथे तैनात असणार आहे. सोनारआळी मित्रमंडळ, कुंभारवाडा दापोली नाका यांच्या बोटींचाही समावेश आहे. येथे नोडल अधिकारी म्हणून आरिफ मुल्लाजी, बिलाल जुईकर, खलिल जुईकर, उदय गुहागरकर, नरेश मालवणकर लक्ष ठेवतील.
- न.प. कडून जीवरक्षकांना परिपूर्ण विमा सुरक्षा
आपत्ती काळात जीवाची पर्वा न करता मदतीसाठी सक्रिय राहणाऱ्या जीवरक्षकांना खासगी कंपनीकडून परिपूर्ण विमा सुरक्षाही देण्यात आली आहे. यासाठी आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तताही करण्यात आल्याचे खेड नगर परिषद मुख्याधिकारी महादेव रोडगे यांनी सांगितले.








