बेळगाव : कॉलेज रोड येथे दुचाकीमध्ये साप शिरल्याने सर्वांचीच भंबेरी उडाली. वाहन चालकाला वाहनात साप शिरल्याची माहिती देऊन तो शिताफीने बाहेर काढण्यात आला. साप वाहनात शिरल्याचे समजताच कॉलेज रोड परिसरात गर्दी झाली. साप सुखरुपपणे वाहनातून बाहेर काढल्यानंतर सर्वांनीच सुटकेचा नि:श्वास सोडला. वाहन चालविताना खबरदारी घेणे गरजेचे असते. दुचाकी असो अथवा चारचाकी सध्या सरपटणारे प्राणी वाहनांमध्ये शिरण्याचे प्रमाण वाढले आहे. मंगळवारी दुपारी एका दुचाकीमध्ये साप शिरला. तरुणांनी शिताफीने तो साप बाहेर काढला. फेसबुक फ्रेंड सर्कलचे संतोष दरेकर व इम्रान यांनी तो साप वनविभागाच्या ताब्यात दिला. यामुळे वाहनात बसताना सर्व तपासणी करूनच बसणे गरजेचे आहे.
Previous Articleव्हॅक्सिन डेपो परिसरातील सौंदर्याला गालबोट
Next Article अंगणवाडी सेविका-मदतनीस भरती प्रक्रिया रखडली









