खलाशांनी काढली रात्र जागून; तुफानी वातावरणात हेलिकॉप्टराया 7 फेऱ्या; थरारक बाचावकाऱ्यानंतर यंत्रणांनी टाकला सुटका निश्वास
खेड / पतिनिधी
रायगड जिल्ह्यातील अलिबाग समुद्रात भरकटलेल्या जहाजातील खलाशींची भारतीय तटरक्षक दलाया बाव पथकाने शुकवारी सकाळी अथक पयत्नानंतर थरारकरित्या सुटका केली. हेलिकॉप्टरने 7 फेऱ्या मारत खलाशांना सुखरूपरित्या किनाऱ्यावर आणता यंत्रणांनी सुटका निश्वास टाकला.
जेएडब्ल्यू कंपनीचे कोळसा घेऊन जाणारे जहाज धरमतरहून जयगडच्या दिशेने जात होते. खराब हवामानामुळे जहाज कुलाबानजीक भरकटले. मुसळधार पाऊस अन् खराब हवामानामुळे झुलणाऱ्या जहाजासाठी नाविकाने अलिबागाच्या समुद्रात नांगर टाकून उभे केले. धुवाधार पर्जन्यवृष्टी, सुस्साट वारा अन् खराब हवामानामुळे गुरूवारी बाचावकार्यात अडथळा निर्माण झाला. यामुळे समुद्रात अडकलेल्या खलाशांनी जे मिळेल ते खाऊन रात्र जागून काढली. घटनेची माहिती मिळताच अलिबागचे तहसीलदार विकम पाटील रातोरात घटनास्थळी पोहोचले. जेएडब्ल्यू कंपनीची यंत्रणाही भरकटलेले जहाज बाहेर काढण्यासाठी दाखल झाली. मात्र खळाळणारा समुद्र अन् सोस्साट्याचा वाऱ्यामुळे शुकवारी सकाळी बाचावकार्य हाती घेण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार भारतीय तटरक्षक दलास याबाबती माहिती दिल्यानंतर पथक सकाळी मुंबईहून अलिबागाया समुद्रात दाखल झाले होते.