प्रतिनिधी / मडगाव
कवळे-फोंडा येथे एका विहिरीत पडलेल्या अत्यंत दुर्मिळ असलेल्या खवले मांजराची सुटका करण्यात फोंड्यातील चरणदेसाई व त्यांच्या साथीदारांनी महत्त्वाची भूमिका बजावली. बुधवारी संध्याकाळी 6.30 वाजता बचाव पथकाला माहिती मिळाल्यावर त्यांनी घटनास्थळी भेट देत त्याची सुटका केली.
हे खवले मांजर काही दिवसांपूर्वी विहिरीत पडले होते. स्थानिक लोकांनी चरणदेसाई यांच्या नेतृत्वाखालील बचाव पथकाला त्याची कल्पना दिली व बचावासाठी बोलावले. अंकित गावडे, गायत्री बखले, मधुराज नाईक यांच्यासह चरणदे साई या प्राणी बचाव पथकाने तत्काळ घटनास्थळ गाठून खवल्या मांजराची सुटका केली.
खवल्या मांजराला विहिरीतून काढल्यानंतर बचाव पथकाला ते जखमी असल्याचे आढळून आले आणि त्याला तातडीने उपचारांची आवश्यकता असल्याचे कळून चुकले. बचाव पथकाने डीसीएफ आनंदजाधव यांना त्या संदर्भात माहिती दिली आणि त्यांनी पशुवैद्यकीय डॉ. लवलीन यांना या प्रकरणी लक्ष घालण्यास सांगितले.
बचाव पथकाने खवल्या मांजराला कांपाल-पणजी येथे प्राथमिक उपचारासाठी डॉ. चारमाईन यांच्याकडे नेले. त्यानंतर डॉ. लवलीन आणि डॉ. चारमेन यांनी त्याच्यावर उपचारकेले.
भारतीय पंगोलिन अर्थात खवलेमांजर हा शेड्यू 1 प्राणी आहे आणि वन्यजीव संरक्षण कायदा 1972 अंतर्गत संरक्षितआहे. बेकायदेशीर आंतरराष्ट्रीय वन्यजीव व्यापारात पंगोलिन हा सर्वात जास्त तस्करी केला जाणारा प्राणीआहे. त्यामुळे हे प्रकरण अत्यंत संवेदनशील आणि महत्त्वाचे ठरले आहे.
जखमी झालेल्या खवल्या मांजरावर योग्य उपचारआणि काळजी घेतल्या नंतर त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येईल अशी माहिती चरण देसाई यांनी दिली.
चरण देसाई हे विषारी साप तसेच बिन विषारी साप, मगरी, माकड तसेच इतर रानटी जनावरांची बचाव करण्यात नेहमीच अग्रेसर राहिले आहेत. फोंड्यात ते सध्या बरेच लोकप्रिय ठरले आहेत.









