वाळपई अग्निशामक दलाचे मोलाचे सहकार्य
प्रतिनिधी /वाळपई
सत्तरीत अचानक पडलेल्या पावसामुळे नदीच्या पाण्याची पातळीत वाढ झाली. अचानकपणे पाण्याचा प्रवाह वाढल्यामुळे सावर्डे पंचायत क्षेत्रातील सोनाळ तार येथे सावर्डे व कुडशे भागातील ग्रामस्थ नदीच्या पालिकडे अडकून पडले. हे वृत्त वाळपई अग्निशामक दलाला समजताच दलाच्या जवानांनी धाव घेउढन त्यांची सुटका केली.
सावर्डे पंचायत क्षेत्रातील सावर्डे कुडशे भागातील मंडळी आपल्या काजू बागायतीमध्ये कामासाठी नदी ओलांडून गेली होती. मात्र अचानकपणे नदीच्या पाण्याची पातळी वाढली. यामुळे त्यांना नदी ओलांडणे शक्मय झाले नाही. त्यांना नदी ओलांडण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करण्याचा प्रयत्न केला मात्र ते शक्मय झाले नाही. शेवटी वाळपई अग्निशामक दलाला पाचारण केल्यावर जवानांनी अथक प्रयत्न करून त्यांची सुटका केली. यामुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात आले.
नदीच्या पालिकडे अडकून पडलेल्यांमध्ये कुडशे येथील कु÷ा राघोबा गावकर (46), धावे येथील कमल प्रकाश गावकर (55), आरती अशोक ठाणेकर (35), विजया विष्णू गावकर व सत्यवती सतीश कुडचिरकर यांचा समावेश होता.
सध्या नदीच्या पाण्याची पातळी वाढत असून पावसाचे प्रमाण असेच सुरू राहिल्यास पातळी आणखी वाढण्याची शक्मयता होती. काही लोक नदीच्या पलीकडे अडकल्याची माहिती अग्निशामक दलाला मिळाल्यानंतर तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. दोरखंड व लाईफ्ढ जॅकेटचा वापर करून त्यांना सुरक्षित पलिकडे आणले, अशी माहिती अग्निशामक दलाचे निरीक्षक संतोष गावस यांनी प्रतिनिधीशी बोलताना दिली.
या मोहिमेत अग्निशामक दलाचे जवान चंद्रकांत माणगावकर, अरविंद देसाई, महादेव गावडे यांनी विशेष प्रयत्न केले.









