जीएसएसच्या विद्यार्थ्यांचा एसकेई सोसायटीकडून सत्कार
बेळगाव : मुर्डेश्वर येथील समुद्रात बुडणाऱ्या विद्यार्थिनींना वाचविण्याचे धाडस जीएसएस कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी दाखविले. त्यांच्या या धाडसामुळे तीन विद्यार्थिनींचे जीव वाचले. याबद्दल एसकेई सोसायटीच्यावतीने सर्व विद्यार्थ्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. जीएसएस कॉलेजच्या भूगर्भशास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांचा अभ्यासदौरा मुर्डेश्वर येथे गेला होता. यावेळी कोलार जिल्ह्यातील मोरारजी देसाई शाळेतील विद्यार्थिनी समुद्रात बुडताना जीएसएस कॉलेजच्या विद्यार्थ्यांना दिसून आल्या. यामुळे विद्यार्थ्यांनी समुद्रात धाव घेत बुडणाऱ्या विद्यार्थिनींना बाहेर काढले. यामुळे तीन विद्यार्थिनींना वाचविण्यात यश आले. कॉलेजचा विद्यार्थी विनायक बडकर, श्रवण पाटील, प्रथमेश पाटील व इतर विद्याथ्यर्नीं मिळून आपल्या जीवाची पर्वा न करता बुडणाऱ्या विद्यार्थिनींना वाचविले. याबद्दल एसकेई सोसायटीचे चेअरमन डॉ. किरण ठाकुर, व्हा. चेअरमन एस. वाय. प्रभू, अशोक शानभाग, सेक्रेटरी मधुकर सामंत, लता कित्तूर, ज्ञानेश कलघटगी, प्राचार्य अरविंद हलगेकर, भूगर्भशास्त्र विभागप्रमुख प्रा. सूरज मेणसे यासह इतर उपस्थित होते.









