Republic Day Maharashtra Chitrarath 2023 : प्रजासत्ताक दिनाला कर्तव्यपथावरील परेडमध्ये सादर करण्यात आलेल्या साडेतीन शक्तीपीठे आणि नारी शक्तीचा सन्मान करणारा महाराष्ट्राच्या चित्ररथाला दुसरा क्रमांक मिळाला आहे.तर उत्तराखंडच्या चित्ररथाला पहिला क्रमांक मिळालाय. उत्तर प्रदेशच्या चित्ररथाला तिसरा क्रमांक मिळाला आहे.या परेडमध्ये 17 राज्यांच्या चित्ररथांचा समावेश होता.‘साडेतीन शक्तिपीठे आणि स्त्रीशक्ती जागर’यावर अधारित चित्ररथ होता.
देशातील शक्तीदेवतांच्या पीठांपैकी साडे तीन शक्तीपीठांचे महाराष्ट्रात दर्शन घडते. याच शक्तीपीठांचे दर्शन गुरुवार 26 जानेवारीच्या प्रजासत्ताकदिनी नवी दिल्लीतील कर्तव्य पथवर (राजपथ) आयोजित संचलनात दाखल केलेल्या चित्ररथातून देशवासियांना घडले. महाराष्ट्र शासनाच्या वतीने आध्यात्मिक शक्ती असलेल्या साडेतीन शक्तीपिठे आणि नारीशक्तीचा चित्ररथ संचलनात दाखल करण्यात आला होता. या चित्ररथातून महाराष्ट्राची अमूर्त अशी लोककला आणि वैशिष्टय़पूर्ण मंदिरांची शैली देखील दाखवली गेली.
यंदाच्या संचलनासाठी महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठे आणि नारीशक्ती हा विषय शासनाने चित्ररथ तयार करण्यासाठी घेतला होता.अतिशय कल्पकतेने तयार केलेला हा चित्ररथ कर्तव्य पथावर उपस्थित असलेल्या नागरिकांच्या दृष्टीने लक्षवेधी व उठावदार ठरला. या चित्ररथात कोल्हापूरचे अंबाबाई मंदिर, श्री क्षेत्र तुळजापूरचे तुळजाभवानी मंदिर, माहूर येथील रेणुकामाता मंदिर (ही तीनही पूर्ण शक्तीपीठे आहेत)व वणी (नाशिक) येथील सप्तश्रुंगीदेवी मंदिर (अर्धेपीठ) या साडेतीन शक्तीपीठांना नारीशक्ती म्हणून स्थान दिले होते.
Previous Article‘बुडा’च्या चौकशीसाठी ‘आप’चे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
Next Article पुन्हा एकदा शेंडा पार्कात शेकडो झाडे आगीत भस्मसात








