बेळगाव : जून महिन्यात हेस्कॉमच्या वतीने विजबिलात भरमसाट वाढ करण्यात आली आहे, त्यामुळे सामान्य जनतेतुन विरोध वाढत आहे ही वीजबिल दरवाढ त्वरित मागे घ्यावी यासाठी महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने सोमवार दिनांक 12 जून रोजी सकाळी 11.00 वाजता नेहरूनगर येथील हेस्कॉम कार्यालय येथे निवेदन देण्यात आले.
राज्य सरकारने २०० युनिटपर्यंत वीजबिल माफ करण्याचा निर्णय घेतला असून या योजनेची अद्याप अंलबजावणीही नाही. मात्र, ग्राहकांच्या वीजबिलात भरमसाठ वाढ करण्यात आली आहे. सर्वसामान्यांना डोक्याला हात लावण्याची वेळ आलेय. त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.









