न्यायालयाच्या आदेशानुसार पेन्शन देण्याची मागणी
बेळगाव : सातव्या वेतन आयोगानुसार 1 जानेवारी 2016 पासूनची कॅन्टोन्मेंट पेन्शनधारकांना पेन्शन द्यावी, असा आदेश उच्च न्यायालयाने दिला होता. याबाबत दोनवेळा निवेदन देण्यात आले. मात्र अजूनही त्याबाबत दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे आता पुन्हा एकदा निवेदन देवून आम्हाला तातडीने न्यायालयाच्या आदेशानुसार पेन्शन द्यावी, अशी मागणी कॅन्टोन्मेंटच्या आयुक्तांकडे करण्यात आली आहे. उच्च न्यायालयाने 27 जानेवारी 2023 रोजी याबाबत आदेश दिला होता. त्याबाबतचे सर्व प्रत कॅन्टोन्मेंटच्या अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे. मात्र अजूनही याबाबत कॅन्टोन्मेंट विभागाने पाऊल उचलले नाही. त्यामुळे शेवटचा उपाय आणि विनंती म्हणून हे निवेदन देण्यात आले आहे. यावेळी कॅन्टोन्मेंट पेन्शनधारक उपस्थित होते.









