प्रतिनिधी / बेळगाव : किल्ला येथे बिबट्या सदृश प्राणी दिसल्याने किल्ला येथील प्रवेशद्वार बंद करण्यात आल्याचे वृत्त समाज माध्यमांवर प्रसिद्ध झाले. परंतु हे वृत्त पूर्णपणे चुकीचे व कोणताही आधार नसलेले होते. बुधवारी सकाळपासून या ठिकाणी सुरळीत पद्धतीने वाहतूक सुरु होती. त्यामुळे कोणीही घाबरून जावू नये, असे आवाहन वनविभागातर्फे करण्यात आले. मंगळवारी दुचाकीचा अपघात झाल्याने याठिकाणी दुचाकी व चारचाकी वाहने बंद करण्यात आली होती. परंतु चुकीच्या वृत्तामुळे किल्ला परिसरात दहशत पसरली. परंतु हे वृत्त चुकीचे असून नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









