कोल्हापूर प्रतिनिधी
काखे- मांगले पुलाजवळ एकजण झाडावर अडकल्याची माहीती समोर आली असून पूर पहाण्यासाठी गेलेल्या हा इसम पाण्यात पडल्यामुळे रात्रभर झाडावर अडकला होता. त्याला वाचवण्यासाठी बचावपथकाला बोलवण्यात आल्यावर तब्बल 16 तासांनी पुराच्या पाण्यातून सुटका करण्यास बचाव पथकास यश आले आहे.
अधिक मिळालेल्या बातमीनुसार, मांगले- लादेवाडीतील बजरंग खामकर हा व्यक्ती गुरुवारी रात्री पूर पाहण्यासाठी काखले- मांगले पूलावर गेला होता. यावेळी त्याचा पाय घसरल्याने नदीत पडला होता. नदीत पडल्यावर पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने तो त्याला परत काठावर येता आले नाही. म्हणून त्याने झाडाचा आधार घेतला.
बजरंग खामकर रात्रभर झाडावर बसून होते. सकाळी पूर पहाण्यासाठी गेलेल्य़ा लोकांना त्यांने ओरडून आपण अडकल्याची माहीती त्याने दिली. त्यानंतर नागरिकांनी लगेच पोलिसांना याची खबर दिल्यावर पोलीस आपत्ती दलासह बोटीतून घटनास्थळी हजर झाले. त्यानंतर तब्बल 16 तासांनी बजरंग खामकर यांची पुराच्या पाण्यातून सुटका करण्यास बचाव पथकास यश आले. पूर पाहण्यासाठी आलो असता पाय घसरून पडल्याची खामकर यांनी माहिती दिली. खामकर यांना वैद्यकीय चाचणीसाठी रुग्णालयात दाखल केले असून नागरिकांनी पुर पहाण्यासाठी गेल्यावर अतिउत्साह करू नये असे आवाहन आपत्ती विभागाने केले आहे.









