पोलीस खात्याने जारी केले संपर्क क्रमांक
पणजी : राज्यात कुठेही धिरयो होत असल्यास त्यासंबंधी माहिती देण्सासाठी पोलिसांनी संपर्क क्रमांक जारी केले आहेत. राज्याच्या पोलीस महासंचालकांनी सदर माहिती दिली असून यापुढे धिरयांच्या प्रकारांकडे पोलीस खाते गांभीर्याने पाहणार असल्याचे म्हटले आहे. राज्यात धिरयो आयोजित करणे बेकायदा ठरविण्यात आले आहे. तरीही उत्तर आणि दक्षिण गोव्यात अनेक ठिकाणी अशा धिरयांचे आयोजन करण्यात येत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे. मात्र यापुढे कोणत्याही परिस्थितीत असे प्रकार खपवून न घेण्याचा निर्धार पोलीस महासंचालकांनी व्यक्त केला असून तमाम जनतेने असे प्रकार पोलिसांच्या निदर्शनास आणून द्यावे, असे आवाहन केले आहे. अशा प्रकारे कोणत्याही भागात धिरयो होत असल्याचे दिसून आल्यास 112 या हेल्पलाईनवर किंवा 7875756000 या वॉटस्अॅप क्रमांकावर पोलिसांना माहिती द्यावी. त्याशिवाय ’गोवापोलीस डॉट गोवा डॉट इन’ या वेबसाईटच्या माध्यमातूनही माहिती दिल्यास पोलीस त्याची दखल घेतील, असे प्रसिद्धी पत्रकातून कळविण्यात आले आहे.









