स्वत:च्या पूर्ण शरीरावर टॅटू काढून घेणाऱ्या लोकांविषयी तुम्ही वाचले किंवा ऐकले असेल. परंतु एक व्यक्ती स्वत:च्या टॅटूसाठी नव्हे तर ट्रोल्सला खास शैलीत प्रत्त्युत्तर देण्यासाठी ओळखला जातो. अनेकदा ब्लॉक होऊनही तो ट्रोल्सना टॅटूद्वारेच उत्तर देतो. ईथन असे नाव असलेल्या या इसमाची शैली बदलेली नाही.
टिकटॉक बंद झाल्याने आणि इन्स्टाग्रामवर आल्यावर अमेरिकेतील फ्लोरिडाचा रहिवासी ईथन स्वत:च्या अनोख्या टॅटूंमुळे पुन्हा चर्चेत आहे. त्याच्या टॅटूच्या संख्येमुळे नव्हे तर तो मेटावर अन्य कारणामुळे चर्चेत आहे. महिन्यापासून त्याने स्वत:चे व्हिडिओ दाखविणे बंद केले होते. त्याचा स्वत:च्या फॉलोअर्ससोबतचा संपर्क संपुष्टात आला होता. याचमुळे आता तो इन्स्टाग्रामवर दाखल झाला आहे.
एका दुसऱ्या टॅटूप्रेमीप्रमाणे ईथनने देखील स्वत:च्या चेहऱ्यावर अनेक टॅटू काढून घेतले आहेत आणि टिकटॉकवर त्याचे व्हिडिओ शेअर केले आहेत. प्रारंभी त्याने ट्रोल्सकडे दुर्लक्ष केले, परंतु ट्रोल्सना अनोख्या शैलीत प्रत्युत्तर देण्याचा निर्णय त्यो घेतला. यामागील उद्देश प्रसिद्धी मिळविणे नव्हता. ईथन एक स्टेटमेंट देऊ इच्छित होता, मी काय आहे हे तो सांगू इच्छित होता.
किती आला खर्च ?
ईथनने ट्रोल्सचे नाव टॅटूत गोंदवून घेण्यास सुरुवात केली आणि त्याचा टॅटू दाखवत व्हिडिओ शेअर करू लागला. थट्टेच्या स्वरुपात प्रत्युत्तर देण्याची ही कवायत लवकरच एकप्रकारे नियमित झाली. ट्रोलर्सच्या एक्स बॉयफ्रेंडच्या नावावने तर कुणाच्या मृत्युमुखी पडलेल्या पित्याचे छायाचित्रही त्याने गोंदवून घेतले आणि याकरता 1 हजार डॉलर्स म्हणजेच 8 लाख 75 हजार रुपयांपर्यंत खर्च केले.
अनेकदा ब्लॉक
परंतु ईथनकरता हे सोपे नव्हते. ईथनला कायदेशीर धमक्या, हत्येची धमकी आणि निर्दयी टीकेला सामोरे जावे लागते. त्याचे टिकटॉक अकौंट 20 पेक्षा अधिक वेळा बॅन झाले होते, ज्यामुळे त्याला दरवर्षी पहिल्यापासून सुरुवात करावी लागली. टॅटूज हे मला ट्रोलिंगपेक्षा अधिक प्रेमाचे आहेत, मी ही कला सोडू इच्छित नाही असे त्याचे सांगणे आहे. अनेक लोकांना त्याचा लुक पसंत नाही, परंतु तो स्वत:वर प्रेम करतो आणि स्वत:च्या टॅटूच्या छंदावरही. तो स्वत:च्या चाहत्यांसाठी नव्या पद्धतींनी समोर येण्याचा विचार करत आहे आणि यालाच कमाईचा स्रोत करू इच्छितो. तो ट्रोल्सना अद्यापही सोडून देत नाही आणि चाहत्यांशी जोडून राहण्याच्या पद्धतींविषयी विचार करतो.









