वार्ताहर/सांबरा
बसवण कुडची येथे जय युवक मंडळ (जीजीबॉईज) च्या वतीने रत्नागिरी जिह्यातील सुवर्णदुर्ग किल्ल्याची हुबेहूब प्रतिकृती बनविण्यात आली असून किल्ला पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे. बेळगाव उत्तर मतदारसंघातील भाजपाचे नेते मुरघेन्द्रगौडा पाटील यांच्या हस्ते फीत कापून किल्ल्याचे उद्घाटन करण्यात आले. नगरसेवक बसवराज मोदगेकर यांनी श्रीफळ वाढविले. सोहम जोडगुंडे, साहिल भडाचे, प्रकाश जोडगुंडे ,निलेश दिवटे आदी कार्यकर्त्यांनी सुवर्णदुर्ग किल्ल्याची हुबेहूब प्रतिकृती बनविली आहे. किल्ल्याच्या उद्घाटनप्रसंगी समाजसेवक परशराम बेडका, सुनील निलजकर ,राजू चौगुलेसह गावातील प्रतिष्ठित नागरिक व मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.









