जयपूर : एका व्यक्तीने आपल्या मावशीचा कथितरित्या खून केला, मृतदेहाचे तुकडे करून दिल्ली महामार्गाजवळच्या परिसरात फेकून मावशी बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली होती. पोलिसांनी तपास करून शेवटी त्याची चौकशी केल्यावर त्यातुन ही घटना उघडकिस आली. त्याने 11 डिसेंबर रोजी आपल्या मावशीचा हातोड्याने खून केल्याचे कबूल केले.
या खूनाची माहीती देताना राजस्थान पोलिसांनी सांगितले की, अनुज शर्मा उर्फ अचत्य गोविंद दास (३३) याला गुरुवारी अटक करण्यात आली. अनुज शर्मा यांने 11 डिसेंबरच्या रात्री आपली मावशी गायब असल्याची तक्रार पोलीसांत दिली होती. त्याची मावशी सरोज शर्मा (65) सकाळी मंदिरात गेल्या आणि त्यानंतर त्या परतल्याच नाहीत.
पण तपासादरम्यान तो एक भरलेली मोठी सुटकेस घेउन घराबाहेर पडताना दिसत आहे. चौकशी दरम्यान त्याने दिशाभुल करणाऱी वक्तव्ये केली. त्यानंतर पोलीसांनी त्याच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यात आले. तर दुसऱ्या एका नातेवाईकाने तो किचनमध्ये रक्ताचे डाग साफ करत असताना बघितले होते. पोलीसांनी आपला खाक्या दाखवताच त्याने आपला गुन्हा कबूल केला.
Previous Articleसर्व पोलीस अधीक्षकांना फोन इन कार्यक्रमाचे दिले जाणार निर्देश
Next Article ‘भीमथडी’त भरडधान्याचे प्रकार पाहण्याची सुवर्णसंधी









