ग्रामपंचायत सदस्य व सामाजिक कार्यकर्त्याची मागणी
न्हावेली / वार्ताहर
न्हावेली गावातील विद्युत वाहिन्यांचे लोखंडी पोल मोठ्या प्रमाणात जीर्ण झालेले आहेत. मागील आठवड्यात न्हावेली मेस्रीवाडी येथे लोखंडी पोल पूर्ण गंजून तुटून पडल्याने आजूबाजूच्या परिसरातील गवताला व काजू बागायतीला आग लागली होती. भविष्यात अशा घटना घडू नयेत व कोणत्याही प्रकारचे नुकसान व जीवित हानी यांसारख्या दुर्घटना घडू नयेतयासाठी न्हावेली गावातील जीर्ण लोखंडी पोलाचे सर्वेक्षण करुन ते बदलावेत, असे निवेदनाद्वारे सामाजिक कार्यकर्ते व न्हावेली ग्रामस्थांनी वीज अधिकाऱ्यांकडे केली.
तर वीज अधिकाऱ्यांनी तात्काळ याबाबतची माहिती घेत जीर्ण झालेले पोलचे टेक्निकल टीम घेऊन सर्वेक्षण करुन खराब झालेले पोल तात्काळ बदलण्याची ग्वाही उपस्थित वीज अधिकाऱ्यांनी दिली.तर तात्काळ हे काम हाती घ्या अन्यथा कोणतीही जीवित हानी अथवा नुकसान झाल्यास आपल्या कार्यालयासमोर उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा उपस्थितांनी दिला.यावेळी सामाजिक कार्यकर्ते आशिष सुभेदार संदेश सावंत,ग्रामपंचायत सदस्य अक्षय पार्सेकर,आरती माळकर,प्रकाश साटेलकर,सुनिल नाईक,आबा चिपकर,नीलेश देसाई,बाळू सावळ,नवनाथ पार्सेकर,राज धवण,रुपेश पार्सेकर,प्रथमेश नाईक,आदी उपस्थित होते.