पेडणे जलसिंचन कार्यालयावर मोर्चा सरपंच अशोक धाऊस्कर यांचा इशारा
पणजी : इब्रामपूर येथे जलसिंचनासाठी घातलेली सुमारे 400 मिटर पाईपलाई&न त्वरीत बदलली नाही तर पेडणे जलसिंचन कार्यालयात मोर्चा नेऊ असा इशार इब्रामपूर हणखणे पंचायतचे सरपंच अशोक धाऊस्कर यांनी दिला आहे. ही पाईपलाईन वेळीच बदलणे अंत्यत गरजेचे असून अन्यथा 200 हून अधिक शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागणार असेही त्यांनी सांगितले. जलसिंचनासाठी घातलेली ही पाईप लाईन खूप जुनी असल्याने ती जीर्ण झाली आहे. त्यामुळे त्यातून येणारे पाण्याचे प्रमाण कमी झाले आहे. पाणी कमी येत असल्याने शेतकऱ्यांना त्रास होत असतो. शेतकरी पर्यायी व्यवस्था म्हणून कॅनलच्या पाण्याचा वापर करीत होते. यंदा डिसेंबर महिन्यापर्यंत दुऊस्ती निमित्त कॅनल बंद असणार असल्याने कॅनलचे पाणीही शेतकऱ्यांना मिळणार नाही. त्यामुळे सुमारे 100 एकरहून अधिक जमीनीत लावलेले केळी, माड, फोपळी व अन्य प्रकारची पिक करपून जातील. म्हणून ही पाईप लाईन वेळीच बदलणे गरजेचे आहे.
पाईप लाईन बदलण्या संदर्भात पंचातीत ठराव घेऊन सर्व सोपस्कर पूर्ण करण्यात आले आहेत. जलसिंचनमंत्री सुभाष शिरोडकर यांची भेट घेऊन त्यांनाही याबाबत सांगण्यात आले आहे. त्यांनी पाईप लाईन बदलण्याचे आश्वासन दिले मात्र अद्याप पाईपलाईन बदलण्यात आली नाही. सरकार संरक्षक भिंती उभारात आहे मात्र शेतकऱ्यांच्या अत्यंत गरजेची असलेली पाईप लाईन वेळेवर का बदलली जात नाही असा प्रश्न निर्माण होत आहे. सरकारला शेतकऱ्यांची काळजी आहे आणि ही पाईप लाईन बदलण्यात येणार हे जरी खरे असले तरी ते काम वेळत होणे फार गरजेचे आहे. अन्यथा हातीतोंडी आलेले पीक करपून जाईल अशी भिती निर्माण झाली आहे. इब्रामपूर गावातील अधिकाधिक लोका शेतीबागायतीवर अवलंबुन आहे. शेती बागायती हाच त्यांचा मुख्य व्यवसाय असून ते त्यांचे उत्पनाचे साधन आहे. वादळ, वारा, पाऊस आणि रानटी जनावरे या सगळ्यांना सामोरे जात शेतकरी आपल्या बागायती सांभाळत असतात त्यात आता पाण्याच्या समस्येला सामोरे जावे लागले तर त्यांना कठीण जाईल. सरकार स्वयमपूर्ण गोवा करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. जे स्वयम पूर्ण आहेत त्यांना अगोदर सहकार्य करणे फार महत्वाचे आहे. नियमित अशा वेगवेगळ्या समस्यांना सामोरे जाव लागले तर जे शेती बागायती व्यावसाय म्हणून करतात ते या व्यवसायापासून दुर होतील. म्हणूनच त्वरीत सदर पाईप लाईन बदलून शेतकऱ्यांना सहकार्य करणे अशी मागणी होत आहे.









