चेन्नई :
रेप्को होम फायनान्स लिमिटेडच्या संचालक मंडळाने 31 मार्च 2025 रोजी संपलेल्या तिमाहीचा आर्थिक निकाल जाहीर केला आहे. यामध्ये तिमाहीत निव्वळ नफा 115 कोटी रुपये झाला. जो आर्थिक वर्ष 2025 च्या तिमाहीत 107 कोटी रुपये होता. हा नफा 8 टक्क्यांनी वाढला. तिमाही आणि आर्थिक वर्षासाठी एकूण कर्जाची नेंदणी 14,492 कोटी रुपये होती, जी एका वर्षापूर्वी 13,513 कोटी रुपये होती. गृहकर्जांचा वाटा 73 टक्के होता तर गृह इक्विटी उत्पादनांचा वाटा 27 टक्के राहिला. मार्च 2025 पर्यंत, कंपनीच्या तामिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा, केरळ, महाराष्ट्र, ओडिशा, गुजरात, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश, झारखंड, राजस्थान आणि पुद्दुचेरी केंद्रशासित प्रदेशात 189 शाखा कार्यरत आहेत.









