नवारस्ता :
कराड-चिपळूण महामार्गावरील कोयना विभागातील वाजेगाव येथे महामार्गाच्या कामामुळे वळण मार्गासाठी बांधलेला छोटा पूल सोमवारी मुसळधार पावसामुळे वाहून गेला. परिणामी कराड-चिपळूण महामार्गावर पाणी वाहू लागल्याने या महामार्गावरील वाहतूक ठप्प होऊन महामार्गावर दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. प्रशासनाकडून महामार्गाच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. त्यामुळे २४ तासांत महामार्ग सुरळीत होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
मुसळधार पावसाने वळण मार्गासाठी बांधलेला छोटा पूल वाहून गेल्याने वाहतूक ठप्प झाली होती. मात्र प्रशासनाने दुचाकी चारचाकी वाहतूक संगमनगर, मणेरी, नेरळे, मोरगिरी या पर्यायी मार्गावरून वळवली, तर या मार्गावरील अवजड वाहतूक काम पूर्ण होईपर्यंत बंद करण्यात आली होती.
गेल्या चोवीस तासांपासून हा महामार्ग सुरळीत करण्यासाठी महामार्गाचे प्रशासन भर पावसात प्रयत्न करीत आहे. सोमवारी रात्रभर जेसीबी आणि पोकलैंडच्च्या सहाय्याने महामार्गावरील वाजेगाव, शिरळ येथील रस्ते, भराव तसेच ज्या ज्या ठिकाणी पावसामुळे धोका, अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे, अशा ठिकाणची धोकादायक चळणे, अश्नणी काढून प्रशासनाकडून महामार्ग मजबुतीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
दरम्यान, चिपळूणकडून कराडकडे जाणारी वाहतूक पर्यायी मार्गाने धिम्या गतीने सुरू करण्यात आली आहे; मात्र कराडकडून चिपळूणकडे जाणारी वाहतूक पोलीस प्रशासनाने अधाप बंद ठेवली आहे. मात्र बुधवारी सायंकाळपर्यंत महामार्गावरील सर्व धोकादायक अडचणी दूर करून महामार्ग सुरळीत होईल, अशी शक्यता आहे. पाटण ते कोयनानगर रस्त्याची तातडीने डागडुजी करण्याची करण्याची मागणी होत आहे.
- कोयना पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कमी
कोयना पाणलोट क्षेत्रात बुधवारी पावसाचा जोर कमी झाला. सकाळी आठ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत कोयनानगर येथे २५ (४१३) मिलिमीटर, नवजा येथे ५३ (४१९) मिलिमीटर आणि महाबळेश्वर येथे ३८ (३६२) मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. धरणातील पाणीपातळी २०६७.०५ फूट झाली आहे. धरणात मंगळवारी सायंकाळी पात्तापर्यंत प्रतिसेकंद तब्बल हजार १४ हजार ७०४ क्यूसेक पाण्याची आवक सुरू झाली आहे. ही आवक या वर्षातील पहिलीन आवक आहे. परिणामी गेल्या २४ तासांत कोयना धरणाच्या पाणीसाठ्यात तब्बल दीड टीएमसी पाण्याची वाढ होऊन मंगळवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत धरणातील पाणीसाठा २५.४३ टीएमसी झाला आहे.








