गळती उपाययोजना समितीचे अध्यक्ष एन.मुंडे यांची माहिती
गळती प्रतिबंधक समितीची धरणस्थळी भेट
कोल्हापूर
सिंचनावरती कोणत्याही प्रकारचा परिणाम न होता काळम्मावाडी धरणाच्या गळतीचे काम पूर्ण केले जाईल अशी माहिती समितीचे अध्यक्ष टी .एन .मुंडे यांनी दुधगंगा धरण येथे दिली. काळम्मावाडी धरण गळती प्रतिबंधक उपाययोजना समितीने आज धरणस्थळी भेट देऊन पाहणी केली. त्याप्रसंगी मुंडे बोलत होते.
यावेळी मुंडे म्हणाले, धरणातील पाणी नैसर्गिक रित्या जितके खोलवर जाणार तितके हे काम होणार आहे. टप्प्याटप्प्याने होणाऱ्या कामामुळे हे काम दोन वर्षांमध्ये पूर्ण होईल असे अपेक्षित आहे. गळतीमुळे धरणाला कोणत्याही प्रकारचा धोका नसल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र शासनाने या धरणाच्या गळतीसाठी ८०.७२ कोटी रुपये निधी मंजूर केला आहे. जानेवारी महिन्याच्या आसपास धरणाच्या गळतीच्या कामाला सुरुवात होण्याची शक्यता आहे.
धरणाच्या मुख्य भिंतीला एकूण नऊ मोनोलीथ असून पैकी चार व पाच आणि सात मध्ये गळतीचे प्रमाण अधिक आहे तर उर्वरित मोनोलीथ मधून गतीचे प्रमाण कमी आहे काळम्मावाडी धरण हे २५.४० टी एम सी ला पूर्ण क्षमताने भरले जाते पण धरणाच्या सुरक्षेसाठी चालू वर्षी २२ टीएमसी पाणीसाठा करण्यात आला होता .तरीही यावेळी धरणाच्या भिंतीतून जवळपास ३७० लिटर प्रति सेकंद गळती सुरू होती आज स्थितीला धरणामध्ये २० टीएमसी पाणीसाठा असून आजही २७० लिटर प्रतिसेकंद गळती होत आहे .
यावेळी धरण गळती प्रतिबंधक उपाय योजना समितीचे सदस्य एच. व्ही. गुणाले, एस. एस. पगार, रिजवान अली ,आर. एम. मोरे, यांच्यासह कार्यकारी अभियंता अशोक पवार, स्मिता माने, अभियंता प्रशांत कांबळे, सहाय्यक अभियंता विलास दावणे ,प्रवीण पालकर, अधीक्षक अभियंता यांत्रिक जयवंत खाडे, कार्यकारी अभियंता बागेवाडी , अभियंता विजय राठोड, शाखा अभियंता नितीन भोजकर व अन्य कर्मचारी उपस्थित होते .









