प्रतिनिधी /बेळगाव
पावसाळय़ात घाटमाथ्यावर रेल्वेमार्गांवर दरड कोसळण्याची शक्मयता असते. त्यामुळे पावसाळय़ापूर्वी घाटातील रेल्वेमार्गांची पाहणी व दुरुस्तीचे काम नैर्त्रुत्य रेल्वेकडून सुरू करण्यात आले. नैर्त्रुत्य रेल्वेचे अतिरिक्त सरव्यवस्थापक पी. के. मिश्रा यांनी हुबळी विभागातील रेल्वे मार्गांची पाहणी करून आढावा घेतला.
बेळगावहून लोंढा मार्गे गोव्याला जाणारा रस्ता घाटमाथ्यावरून जातो. या मार्गावर अनेकवेळा पावसामुळे दरड कोसळत असते. मागील वषी दूधसागरनजीक रेल्वे इंजिनवर दरड कोसळून अपघात झाला होता. हे अपघात टाळण्यासाठी पावसाळय़ापूर्वीच अशा धोकादायक ठिकाणी उपाय-योजना राबविण्यासाठी रेल्वेकडून प्रयत्न सुरू आहेत. लोंढा-दूधसागर या दरम्यान येणाऱया कॅसलरॉक रेल्वेस्थानकावर अतिरिक्त सरव्यवस्थापकांनी भेट देऊन मार्गांची पाहणी केली. पावसाळय़ापूर्वी हे काम पूर्ण झाल्यास अपघातांची संख्या कमी होण्यास मदत होईल.









