बेळगाव : खडेबाजार येथील गोकुळ पुरोहित स्वीटमार्टजवळील रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली आहे. याठिकाणी दुचाकी, चारचाकी चालक, दिव्यांग यांना आणि पादचाऱ्यांनासुद्धा ये-जा करणे कठीण झाले आहे. हा भाग अत्यंत वर्दळीचा असून येथे अनेक दुकाने आणि विविध व्यवसाय असल्याने सतत लोकांची ये-जा सुरू असते. रस्त्याची अवस्था पाहिल्यास लहानसहान अपघात होत आहेत. रात्रीच्यावेळी जर वीजपुरवठा खंडित झाला तर मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. नागरिकांनी याबाबत वारंवार महानगरपालिकेला कळविले आहे. परंतु याकडे कानाडोळा केला आहे. तरी कोणताही अनर्थ घडण्यापूर्वी मनपा या रस्त्याची दुरुस्ती करेल का?, असा प्रश्न निर्माण झाला आहे
Previous Articleकारवारमध्ये काळादिनानिमित्त निषेध सभा
Next Article साखर कारखान्यांनी आधी दर जाहीर करावा









