प्रतिनिधी / बेळगाव
पाण्याची टंचाई सुरू असतानाच जलवाहिन्यांना गळती लागण्याचे सत्र सुरूच आहे. गुरुवारी कपिलेश्वर ब्रिजजवळील एसपीएम रोडवरील रेणुका हॉटेलनजीक जलवाहिनीला लागलेल्या गळतीची महापौर शोभा सोमनाचे यांनी पाहणी केली. याचवेळी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना बोलावून त्वरित दुरुस्ती करण्याचा आदेश दिला.
याठिकाणी शेकडो लिटर पाणी दररोज वाया जात होते. नागरिकांनी याबद्दल तक्रार करूनदेखील पाणीपुरवठा मंडळाने याकडे दुर्लक्ष केले होते. महापौर शोभा सोमनाचे यांनी गुरुवारी जलवाहिनीच्या गळतीची पाहणी केली व त्वरित अधिकाऱ्यांना बोलावून तत्काळ दुरुस्त करण्याचा आदेश दिला. त्यानुसार हे काम सुरू झाले आहे.









