बऱ्याच दिवसानंतर एलअॅण्डटी कंपनीने दिले लक्ष
बेळगाव : शहापूर, खडेबाजार येथे बऱ्याच दिवसांपासून मुख्य पाईपला गळती लागली होती. बऱ्याच दिवसांनंतर एलअॅण्डटी कंपनीने त्याची दुरुस्ती केली आहे. गळती दुरुस्त करावी, अशी मागणी वारंवार करण्यात आली. मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले होते. मात्र वॉर्ड क्रमांक 27 चे नगरसेवक रवी साळुंखे यांनी पाठपुरावा करताच पाईपची दुऊस्ती करण्यात आली. शहापूर परिसरात अनेक ठिकाणी पाईपला गळती लागली आहे. कपिलेश्वर येथेही बऱ्याच दिवसांपासून पाईप फुटून शेकडो लिटर पाणी वाया जात होते. खडेबाजार, शहापूर येथेही दररोज पाणी वाया जात होते. मात्र त्याकडे महापालिकेने आणि एलअॅण्डटी कंपनीने दुर्लक्ष केले होते. याबाबत कंपनीच्या अधिकाऱ्यांना कळविण्यात आले. त्यानंतर खोदाई करून त्याची दुरुस्ती सुरू केली आहे. यामुळे समाधान व्यक्त होत आहे.









