वाहतुकीला रस्ता सुरळीत केल्याने नागरिकांतून समाधान
वार्ताहर /कंग्राळी ब्रुदुक
कंग्राळी खुर्द येथील रामनगर तिसरा क्रॉस रस्त्यावरील स्मार्टसिटी योजनेर्तंगत रस्त्यावर बसविण्यात आलेला पेव्हर्स रस्ता निष्कृष्ठ दर्जाच्या कामामुळे खचला होता. परंतु ग्रामपंचायत सदस्यांच्या कार्यतत्परतेमुळे त्वरित ख•s बुजवून रस्ता वाहतुकीला सुरळीत करण्यात आल्यामुळे नागरिकांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. शासनाने तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींना स्मार्टसिटी योजनेर्तंगत मोठा निधी मंजूर करून विकासकामांना चालना दिली होती. काँक्रीट रस्ते, रस्ता डांबरीकरण रस्त्यावर पेव्हर्स बसविणे अशा वेगवेगळ्या माध्यमातून रस्त्यांची कामे करण्यात आली होती.
तीन महिन्याच्या आतच रस्त्यावर पडले होते ख•s
कंग्राळी खुर्द येथील रामनगर तिसरा क्रॉस येथील रस्त्यावर बसविलेल्या पेव्हर्स रस्त्यावर सहा महिन्याच्या आतच रस्ता खचून मोठे ख•s पडलेले होते. रस्ता करतेवेळी रस्त्यावर प्रथम मोठी खडी पसरवून नंतर त्यावर पेव्हर्स बसविणे गरजेचे होते. परंतु कंत्राटदाराने मातीवरच पेव्हर्स बसविल्यामुळे सहा महिन्याच्या आतच पेव्हर्स रस्ता खचून ठिकठिकाणी ख•s पडल्याचे चित्र दिसून येत असल्यामुळे शासनाचा लाखो रुपयांचा निधी वाया जात आहे. याला जबाबदार कोण, अशा प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
नागरिकही तितकेच जबाबदार ?
शासनाच्या निधीतून एखाद्या रस्त्याचे काम सुरू असतेवेळी ग्रा. पं. सदस्यांबरोबर नागरिकांनीसुद्धा एखादे विकासकाम बरोबर होत आहे की, नाही याची देखरेख करणे गरजेचे आहे. एखादेवेळेस कंत्राटदाराकडून काम निष्कृष्ठ दर्जाचे होत असेल तर काम तिथेच थांबवून वरिष्ठांना कळवून काम चांगल्या प्रतीचे करून घेणे गरजेचे असते. परंतु तसे होत नाही. यामुळे ग्रा. पं. सदस्यांबरोबर नागरिकांनीही लक्ष देणे गरजेचे आहे. यावेळी ग्रा. पं. सदस्य गैंडाडकर, प्रशांत पाटील, वैजनाथ बेन्नाळकर, तालीम मंडळाचे उपाध्यक्ष किरण पाटील, विशाल गैंडाडकर यांनी त्वरित ग्रा. पं. कर्मचाऱ्यांना बोलावून घेऊन खचलेल्या रस्त्यावर भराव घालून परत पेव्हर्स बसवून घेतले. रस्ता वाहतुकीला सुरळीत केल्यामुळे नागरिकांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.









