नगरसेवक शंकर पाटील यांचा पाठपुरावा
बेळगाव : गणेशोत्सव काळात केळकर बागेतील नवग्रह मंदिराजवळील विहिरीतील विद्युतपंप नादुरुस्त झाला होता. त्यामुळे सदर पंपची दुरुस्ती करण्यात यावी, यासाठी नगरसेवक शंकर पाटील यांनी पाठपुरावा चालविला होता. त्यानुसार एलअँडटीकडून बुधवारी सदर पंपची दुरुस्ती करण्यात आली असल्याने परिसरातील पाणीपुरवठा सुरळीत झाला आहे. त्यामुळे नागरिकांतून समाधान व्यक्त केले जात आहे. नवग्रह मंदिराजवळील सार्वजनिक विहिरीतील विद्युतपंप गणेशोत्सव काळात नादुरुस्त झाला होता. सदर पंप दुरुस्त करण्यात यावा, अशी सूचना नगरसेवक शंकर पाटील यांनी एलअँडटीला केली होती. मात्र, तेथील अधिकारी व कर्मचारी गणेशोत्सव नियोजनात व्यस्त होते. त्यामुळे सदर पंपाची बुधवारी दुरुस्ती करण्यात आल्याने विविध गल्ल्यांमधील पाणीपुरवठा सुरळीत झाला आहे.









