अध्यक्षपदी एम. कृष्णारेड्डी : जी. टी. देवेगौडा यांची गच्छंती
बेंगळूर : माजी पंतप्रधान व निजदचे राष्ट्रीय अध्यक्ष एच. डी. देवेगौडा यांनी पक्षाच्या राज्य कार्यकारिणीची पुनर्रचना केली आहे. त्याचप्रमाणे केंद्रीय मंत्री व निजद प्रदेशाध्यक्ष एच. डी. कुमारस्वामी यांची पक्षाच्या उच्चस्तरीय राजकीय व्यवहार समितीच्या अध्यक्षपदी नेमणूक करण्यात आली आहे. राज्य निजद कार्यकारिणी समितीच्या अध्यक्षपदावरून माजी मंत्री जी. टी. देवेगौडा यांना हटविण्यात आले असून त्यांच्या जागी माजी उपसभापती एम. कृष्णारेड्डी यांची नेमणूक करण्यात आली आहे. निजद राज्य कार्यकारिणीच्या संचालकपदी निजद विधिमंडळाच्या उपनेत्या शारदा पुर्या नायक, अरकलगुडचे आमदार ए. मंजू यांची नेमणूक करण्यात आली आहे. तर सदस्य म्हणून निजद विधिमंडळ पक्षाचे नेते सी. बी. सुरेश बाबु, आमदार एम. टी. कृष्णप्पा, एस. एल. भोजेगौडा, माजी आमदार के. ए. तिप्पेस्वामी, युवा निजदचे अध्यक्ष निखिल कुमारस्वामी यांची नेमणूक करण्यात आली आहे.
प्रचार समितीवर वाय. एस. व्ही. दत्ता अध्यक्ष
निजदच्या राज्य प्रचार समितीच्या अध्यक्षपदी माजी आमदार वाय. एस. व्ही. दत्ता यांची नेमणूक करण्यात आली आहे. प्रचार समितीवर माजी आमदार अश्विन कुमार, सुरेश गौडा, आमदार सी. एन. बालकृष्ण, विधानपरिषद सदस्य टी. ए. शरवण, टी. एन. जवराईगौडा, माजी आमदार डॉ. के. अन्नदानी, रविंद्र श्रीकंठय्या, आमदार भीमनगौडा पाटील, जी. डी. हरिशगौडा, स्वरुप प्रकाश, एम. आर. मंजुनाथ, के. विवेकानंद, सी. एन. मंजेगौडा, डॉ. सूरज रेवण्णा, ज्येष्ठ नेते सुधाकर एस. शेट्टी यांची सदस्य म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. तसेच निजदच्या शिस्तपालन समितीच्या अध्यक्षपदी माजी मंत्री डी. नागराजय्या यांची नेमणूक करण्यात आली आहे.









