कोल्हापूर :
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या यल्लमाच्या ओढ्यावरील रेणुकादेवीची आंबिल यात्रा 21 डिसेंबरला साजरी करण्यात येत आहे. रेणुका मंदिर यात्रा समिती अध्यक्ष ओमदार प्रकाश टाकळे व उपाध्यक्ष आकाश श्रीनिवास यादव यांच्या मार्गदर्शनाखाली यात्रेच्या तयारीला सुऊवात करण्यात आली आहे. यात्रादिनी रेणुकादेवीच्या दर्शनासाठी हजारो भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेऊन रेणुकादेवी मंदिरासमोरील रस्त्यावर महिला व पुऊषांसाठी स्वतंत्रपणे कापडी दर्शन मंडप उभारला जाणार आहे.
दरम्यान, पहाटे 4 वाजता रेणुकादेवीला अभिषेक करण्यात येईल. देवीची महापूजा बांधून आंबिल यात्रेला सुऊवात करत मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले केले जाईल. दुपारी 2 वाजता देवीची आरती कऊन पहिला पालखी सोहळा साजरा करण्यात येईल. उदं ग आई उदंच्या गजरात पालखी रेणुकादेवी मंदिराला प्रदक्षिणा घालेल. प्रदक्षिणा पूर्ण झाल्यानंतर पालखीला मंदिरातील सदरेवर विराजमान केले जाईल. रात्री आठ वाजता देवीचा दुसऱ्यांदा पालखी साजरा केला जाईल. पालखी सोहळ्याची सांगता केल्यानंतरच मंदिराच्या पिछ़ाडीस असलेले मानाचे चारही जग आपआपल्या स्थानांकडे रवाना केले जातील.
यात्रेनिमित्त दिवसभरात हजारो भाविकांकडून रेणुकादेवीला अर्पण करण्यात येणारे नैवेद्य स्वीकारण्यासाठी रेणुका मंदिर यात्रा समितीचे अनेक कार्यकर्ते मंदिरात सक्रीय असणार आहेत. त्यांच्याकडून नैवेद्याची नासाडी होऊ नये याचीही दक्षता घेतली जाणार आहे.
देवीच्या दर्शनाला येणाऱ्या भाविकांना देवीचा प्रसाद म्हणून मंदिराकडे जमणाऱ्या नैवेद्यांचे वाटप केले जाणार आहे. नैवेद्य ऊपी मिळालेल्या प्रसादाचा रेणुकादेवी मंदिर पिछाडीस असलेल्या मोकळ्या बसून आस्वाद घेता येईल, अशी व्यवस्था रेणुका मंदिर यात्रा समितीकडून केली जाणार आहे. मंदिर परिसरातच पिण्याच्या पाण्याचीही सोय करण्यात येणार आहे.
रेणुकादेवीच्या जगांचे शुक्रवार 20 रोजी आगमन…
सौंदत्ती डोंगरावरील रेणुकादेवीच्या यात्रेसाठी गेलेल्या मानाच्या चार जगांचे शुक्रवार 20 रोजी रात्री 8 वाजता कोल्हापुरात आगमन होईल. हे चारही जग 21 रोजीच्या आंबिल यात्रेसाठी यल्लमाच्या ओढ्यावरील रेणुकादेवी मंदिराच्या पिछाड़ीस उभारल्या जाणाऱ्या मंडपात विराजमान केले जातील. शनिवारी पहाटे चार वाजल्यापासून रेणुकादेवी, परशराम व मातंगीदेवीसोबत जगांचेही भाविकांना दर्शन घेता येणार आहे.








