रत्नागिरीतील कलाक्षेत्रावर अत्यंत धक्कादायक दुःखद बातमी सोमवारी पसरली. एक चांगले नेपथ्यकार, रंगभूषाकार,पेंटर,मुर्तीकार,वेषभुषाकार, अभिनेते, आणि एक कुशल जादूगार म्हणून प्रसिद्ध असलेले नंदकुमार सोहनी यांचे निधन झाले.
सोहनी यांची सर्वदूर ख्याती पसरलेली होती. सोहनी पेंटर नावाने ते ओळखले जात असत. मुर्तीकलेच्या स्वतंत्र व्यवसायाला गेल्याच वर्षी त्यांच्या मूर्तीकला व्यवसायाला ५० वर्षे झाली होती. त्यांच्या निधनाने कलाक्षेत्र, रंगभूमीवर त्यांची उणिव नक्कीच जाणवत राहणार असून दुःख व्यक्त केले जात आहे.
Previous Articleउद्धव ठाकरेंनी पालघर लिंचिंग प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले नाहीत- भाजप अध्यक्ष नड्डा
Next Article भाजप हे खोटेपणाचे विद्यापीठ- डीके शिवकुमार









