रत्नागिरी, प्रतिनिधी
रत्नागिरी शहरातील प्रसिद्ध ज्योतिषी व कीर्तनकार महादेव उर्फ नाना विनायक जोशी यांचे कोल्हापूर येथे रुग्णालयात अल्पशा आजाराने निधन झाले. येथे प्रसिद्ध असलेल्या 18 हातांच्या गणपती मंदिराचे मंदिराच्या व्यवस्थापनाचे ते अध्यक्ष होते. आमराईतील नाना जोशी म्हणून ते रत्नागिरीत सुपरीचित होते. प्रसिद्ध ज्योतिषी तसेच कीर्तनकार म्हणून रत्नागिरी जिल्ह्यात त्यांची ओळख होती. रत्नागिरी तालुक्यातील अनेक ठिकाणी विविध धार्मिक कार्यक्रमांसाठी त्यांना आमंत्रित करत. त्यांच्या पश्चात पत्नी, मुली, भाऊ, पुतणे, नातवंडे असा मोठा परिवार आहे.
Previous Articleप्लायवूडच्या नावाखाली दारुची वाहतूक
Next Article पावसाचे पुनरागमन, राज्यभर यलो अलर्ट









