पालकमंत्री सतीश जारकीहोळी, मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, चन्नराज हट्टीहोळी यांच्या हस्ते भूमिपूजन
वार्ताहर/उचगाव
बेळगाव-वेंगुर्ला मार्गाच्या नूतनीकरण कामाचा शुभारंभ शनिवारी करण्यात आला. पालकमंत्री मंत्री सतीश जारकीहोळी तसेच महिला बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, विधान परिषद सदस्य चनराज हट्टीहोळी, मृणाल हेब्बाळकर यांच्या हस्ते सुळगा (हिं.) येथे बेळगाव-वेंगुर्ला रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. गेल्या सहा महिन्यांपासून हा रस्ता मोठ्या प्रमाणात खराब झालेला होता. बेळगावपासून बाचीपर्यंत रस्त्यामध्ये मोठमोठे खड्डे पडलेले होते. हा रस्ता दुऊस्त करावा म्हणून अनेकवेळा निवेदने व रास्ता रोको केले होते. याची दखल घेऊन ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर व सतीश जारकीहोळी यांनी या रस्त्यासाठी नऊ कोटी ऊपये निधी मंजूर केला आहे. शनिवारी सकाळी 10 वाजता सुळगा येथून रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले.
हिंडलगा ते केंबाळी नाल्यापर्यंत एक किलोमीटरचा रस्ता दुपदरी करण्यात येणार आहे. त्यानंतर सुळगा ते बाचीपर्यंत हा रस्ता दुऊस्त करून त्या रस्त्यावरती डांबरीकरण करणार आहे. हा संपूर्ण रस्ता रायचूर ते बाचीपर्यंत दोन पदरी मंजूर केलेला होता. परंतु बेळगावपर्यंत रस्ता दुपदरी करण्यात आला. त्यानंतर बेळगाव ते बाची रस्त्याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करण्यात आलेले होते. आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी या रस्त्याच्या कामासाठी नऊ कोटी ऊपये निधी मंजूर केलेला आहे. शनिवारी पालकमंत्री सतीश जारकीहोळी व लक्ष्मी हेब्बाळकर, विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी, मृणाल हेब्बाळकर, युवराज कदम यांच्या हस्ते भूमिपूजन करून या रस्त्याच्या कामाला सुऊवात करण्यात आली. बेळगाव-वेंगुर्ला हा कर्नाटक-महाराष्ट्र-गोवा या तिन्ही राज्यांना जोडणारा एकमेव रस्ता असल्याने रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ सुरू असते. त्यामुळे बेळगाव ते बाची रस्ता चार पदरी करण्यासाठी शासनाकडे मागणी करण्यात आलेली होती. तरी अद्याप या रस्त्याकडे चार पदरी करण्यासाठी दुर्लक्षित करण्यात आलेले आहे.
हिंडलगा ते सुळगा रस्ता दुपदरी
हिंडलगा ते सुळगा हा रस्ता दुपदरी करण्यात येणार आहे. त्यानंतर राहिलेला सुळगा ते बाची या रस्त्याचे नूतनीकरण करून त्यावरती डांबरीकरण करण्यात येणार आहे. याप्रसंगी सुळगा ग्रा. पं.अध्यक्ष रमेश खन्नुकर, उपाध्यक्ष भागाण्णा नरोटे, युवराज कदम, ग्रा. पं. सदस्य, अध्यक्ष-उपाध्यक्ष्। देवस्थान कमिटीचे सदस्य व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.









