माध्यम प्रतिनिधींच्या सोयीसाठी उभारणी
बेळगाव : आपल्या वेगवेगळ्या समस्या, तक्रारी किंवा मागण्या घेऊन नागरिक सातत्याने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे येत असतात. त्यांच्या निवेदनाचा स्वीकार करण्यासाठी जिल्हाधिकारी आल्यानंतर वृत्तांकन करण्यासाठी माध्यम प्रतिनिधीसुद्धा बहुसंख्येने उपस्थित असतात. त्यांच्या सोयीसाठी जिल्हाधिकारी कार्यालय आवारात उभ्या करण्यात आलेल्या शेडचे नूतनीकरण करण्यात आले आहे. कोणताही मोर्चा, आंदोलनावेळी वृत्तांकन करण्यासाठी आलेल्या माध्यम प्रतिनिधींना तासन् तास तिष्ठत रहावे लागते. त्यांच्या सोयीसाठी या कार्यालयाच्या आवारामध्ये एक शेड उभे करण्यात आले होते. मात्र, या शेडचे आच्छादन फाटले होते. याची दखल घेऊन या शेडचे आच्छादन बदलण्यात आले. तसेच या शेडचे नूतनीकरण करण्यात आले.









